चोपडा: चौगाव येथे ३८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, चोपडा ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Nov 18, 2025 चोपडा तालुक्यात चौगाव हे गाव आहे. या गावातील रहिवासी सिताराम राजेंद्र कोळी वय ३८ या तरुणाने आपल्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.