दारव्हा: गिट्टी खाणीतील स्फोटामुळे शहरातील शिक्षक कॉलनीतील अनेक घरांना तडे,रहिवाशांची तहसीलदारांकडे तक्रार
दारव्हा शहराजवळील बागवाडी परिसरातील गिट्टी खदान मध्ये सुरू असलेले प्रचंड स्फोट पुन्हा एकदा नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत असून लगतच असलेल्या वृंदावन शिक्षक गृहनिर्माण सहकारी संस्थेने याविषयी दि. २७ नोव्हेंबर ला दु. १ वा.तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली आहे.