इंदापूर: माणसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार फक्त डाॅ.बाबासाहेबांमुळे मिळाला - आ.दत्तात्रय भरणे
Indapur, Pune | Apr 14, 2024 हजारो वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या दिन दुबळ्या समाजाला गुलामीच्या शोषणातून बाहेर काढून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला असल्याचे गौरवोद्गार आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढले.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त रविवारी इंदापुर शहरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आयोजित जयंती निमित्त आ.भरणे अभिवादन करण्यास आले यावेळी ते बोलत होते.