घुमर्रा, हिरापूर, चांदीटोला, कवलीवाडा, मोहाडी, तेलनखेडी येथे सुरु असलेल्या भागवत सप्ताह कार्यक्रमाला माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी भेट दिली. ग्रामस्थांनी केलेल्या आयोजनाची प्रशंसा करून अशा धार्मिक कार्यक्रमांनी समाजात भक्ती व एकता वाढते त्यामुळे असे आयोजन वेळोवेळी करण्यात यावे अशी साद याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी घातली.