महाआरोग्य शिबीर (मोफत रोगनिदान, उपचार व शस्त्रक्रिया) स्थानिक गुरुनानक विद्यालय विरुर स्टेशन येथे पार पडले होते. या शिबीराचा विरुर स्टेशन परीसरातील २१४३ नागरीकांनी लाभ घेतला; त्यापैकी ४४२ रूग्ण विविध शस्त्रक्रियांसाठी पात्र ठरले. या पात्र रुग्णांवर सावंगी (मेघे) येथे विविध शस्त्रक्रिया पार पडत आहेत. त्या अनुषंगाने आज दि ३१ जुलै १ वाजता आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय विरूर येथून ४० रुग्णांची तिसरी रुग्ण तुकडी शस्त्रक्रियेसाठी रवाना झाली.