दारव्हा: शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री, कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते गणेश भोयर यांची मागणी
दारव्हा शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची खुलेआम विक्री वाढली असून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात तर हा जीवघेणा ‘चायना मांजा’ मोठ्या प्रमाणात पडलेला दिसत आहे. त्यामुळे या मांज्या विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश भोयर यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिनांक 27 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता दरम्यान केली आहे.