धावत्या व्हिस्टा कारने अचानक पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.ही थरारक घटना कन्नड–पिशोर रस्त्यावरील सुहासनी बाल रुग्णालयासमोर घडली.साहिल शेख हे एमएच ४४ बी ४३४८ क्रमांकाच्या कारने हस्ता (ता. कन्नड) येथे जात होते.धुळे येथून ट्रकसाठी ऑइल खरेदी करून मक्रणपूर येथे सामान सोपवून ते परतत होते.थंडीमुळे पिशोर नाका येथे त्यांनी कारचा हिटर सुरू केला होता.