कन्नड शहरातील बसस्थानक परिसरात शहर पोलिसांनी सायंकाळी जुगार अड्ड्यावर छापा टाकला.बंद कापड दुकानाच्या मागील भागात झन्ना-मन्ना जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.यावेळी सहायक फौजदार नासेर पठाण, पोहेकॉ संजय आटोळे, पोलीस अंमलदार सोमनाथ गवळे व वाहन चालक पोलीस नाईक प्रवीण बरडे सहभागी होते.छाप्यात रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला