नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत येणाऱ्या हरणाकुंड शिवारात मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबरला पहाटे पाच - साडेपाच वाजताच्या दरम्यान जबल्पुर कडून नागपूरकडे येणारा भरधाव ट्रक पलटला. हा ट्रक महामार्गाच्या कडेला जंगलाच्या दरीत कोसळला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे.