औसा: पंचायत समिती येथे प्रहार संघटनेचे आंदोलन
Ausa, Latur | Mar 13, 2024 औसा तालुक्यातील रामेगाव येथे रस्त्याचे काम निष्कृष्ट झाले असून, चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीन महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती जि.प.च्या बांधकाम उपविभागाच्या गेटलाच उपअभियंत्यांचा फोटो लावून प्रतीकात्मक निषेध आंदोलन केले.