सावंतवाडी: आक्रमक बनलेला ओंकार हत्ती मुंबई-गोवा महामार्गावर : नागरिकांत घबराट
दोडामार्गातून गोव्याच्या दिशेने गेलेल्या ओंकार नामक हत्तीने पुन्हा सिंधुदुर्गच्या दिशेने कुच केली आहे. रात्री उशिरा हा हत्ती काल वनविभागाच्या कर्मचार्यांना दृष्टीस पडला. त्याला पिटाळण्याचे प्रयत्न झाले. मात्र सध्या तो पत्रादेवी चेकपोस्ट कडून मार्गस्थ झाला आहे. सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमारेषेवर तो घुटमळत आहे.