मोहाडी तालुक्यातील सनफ्लॅग वरठी येथे दि. 17 जानेवारी रोजी क्रेन ऑपरेटर मारोती भिवगडे हे 70 फूट उंचीवरून पडल्याने मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत आज दि. 18 जानेवारी रोज रविवारला दुपारी 12 वाजता भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी सन फ्लॅग कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांच्याशी भेट घेत मृतक मारोती देवगडे यांच्या कुटुंबीयांना योग्य न्याय देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.