आज दिनांक 13 जानेवारी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर उद्या शहरात मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. मतदानादरम्यान कोणीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा कडक इशारा त्यांनी दिला. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह, खोटे किंवा भडकावू पोस्ट, फोटो अथवा मजकूर टाकल्यास सायबर गुन्हा नोंदवण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. शांततापूर्ण आणि निर्भय वातावरण