हिंगणघाट: जी. बी. एम. एम. हायस्कूल येथे नाणे प्रदर्शन: आकर्षण ठरला ११२ अक्षरांचा शुभेच्छा संदेश वंडरफुल राईस दाणा
हिंगणघाट,स्थानिक निसर्गसाथी फाऊंडेशन व ऐतिहासिक गृप यांच्या संयुक्त वतीने ९ व १० जानेवारीला नाणे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रदर्शन जी. बी. एम. एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. नाणे प्रदर्शनात राहुल वाकरे, नितीन भोगल, आनंद वांदिले, वासुदेव पेडवे व पंचशील धूल हे नाणे संग्राहक आपली नाणी प्रदर्शनात ठेवणार आहेत. सादिक पटेल ऐतिहासिक वंडरफुल राईस दाणा आकर्षण ठरले आहे.