चिपळुण: महसूल विभागाने जप्त केलेल्या ट्रकची चोरी; मालकावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे महसूल विभागाने कारवाई करून जप्त केलेल्या तब्बल १९ लाख रुपयांचा ट्रक चोरून नेल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक मालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या ट्रक अधिक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्याच्या उद्देशाने शिवाजी चौकाजवळ उभा करण्यात आला होता. मात्र तोपर्यंत आरोपीने तो पळून नेला.