भंडारा: 'पैसे घेऊन तिकीट विकल्याचा' आरोप खोटा; नगरपरिषदेसाठी मी कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही - अभिषेक कारेमोरे!
भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगरपरिषद निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस चे तिकीट मिळाल्यानंतर, माझ्याबद्दल शहरात जाणीवपूर्वक चुकीचा आणि बदनामीकारक प्रचार केला जात आहे. योगेश सिंगनजुळे यांनी पैसे घेऊन मला तिकीट मिळवून दिल्याचा जो गैरसमज पसरवला जात आहे, तो पूर्णपणे खोटा आहे, असे स्पष्टीकरण नगरपरिषदेचे उमेदवार अभिषेक कारेमोरे यांनी दिले आहे. कारेमोरे यांनी चांदपूरच्या हनुमानजींना साक्षी ठेवून सांगितले की, एकही रुपयाचा आर्थिक व्यवहार मी योगेश सिंगनजुळे यांच्याशी केलेला नाही.