महाराजांच्या विषयी राजकारण थांबवावे - भाजपा महाराष्ट्र महासचिव विक्रांत पाटील यांची टीका
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयात घाणेरडे राजकारण करणे औरंगझेब फॅन क्लब ने त्वरित थांबवावे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसाठीच अस्मितेचा विषय आहेत, परंतु महविकास आघाडी ची टोळी या विषयातही राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे हे दुर्दैवी आहे. ही तीच काँग्रेस आहे जी औरंगाबाद च नाव छत्रपती संभाजी नगर करण्यास विरोध करत होती, अशी टीका आज दुपारी ३.३० वाजता भाजप महाराष्ट्र महासचिव विक्रांत पाटील यांनी दिली आहे.