पुणे विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सची सेवा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत असून प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ५ डिसेंबरला पुण्यात येणारी २१ आणि जाणारी २१ अशी एकूण ४२ उड्डाणे रद्द झाली. सहा दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ अद्याप सुरळीत झालेला नाही. या संदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी इंडिगोचा “अत्यंत बेजबाबदारपणा” असल्याची टीका केली. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असू