आज गंगापुर दिनांक 29 नोव्हेंबर रोजी गंगापूर-वैजापूर रोडवरील नरहरी रांजणगाव पाटीजवळ टू व्हीलर आणि उसाचा ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज च्या सुमारास घडला. टू व्हीलर आणि उसाचा ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक अनिकेत मुळक आणि चेतन पंडित यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.