नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या शुक्रवारी दुपारी ३ वाजता नेवाशात सभा होणार आहे. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहतील अशी माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. नगरपंचायत चौक येथे ही सभा होईल, नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे.