जामखेड: वाळू माफियाकडून साडे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.. अवैध गौण खनिज उत्खननाचं सत्र सुरूच...
जामखेड येथे वाळु माफियाविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 2 आरोपींकडुन 5. 30. 000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब,पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमाची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.