आज दिनांक 2 डिसेंबर दुपारी बारा वाजता पैठण नगरपालिकेच्या निवडणुकीत आज सकाळपासून शांततेत मतदान होत असताना, राज्याचे माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पैठणमधील विविध मतदान केंद्रांना भेटी देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. दानवे यांनी केंद्रांवर मतदारांची उपस्थिती, मतदानाचा वेग आणि व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहनही केले.