चाळीसगाव: शहरात गुन्हेगारांचे धाडस कमालीचे वाढले असून, भरदिवसा तोतया पोलिसांनी एका वृद्ध महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस असल्याचे भासवून दोन भामट्यांनी ६९ वर्षीय वृद्धेच्या हातातील सुमारे ६ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या बळजबरीने हिसकावून नेल्या. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.