औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा ते पोहरादेवी जाणाऱ्या जय सेवालाल पायदळ दिंडीचे दिनांक पाच जुलै शनिवार रोजी दुपारी अडीच वाजे दरम्यान औंढा नागनाथ शहरातील मंदिर कमान परिसरात भाविकांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर दिंडी पोहरादेवीकडे रवाना झाली दरम्यान पेट्रोल पंप परिसरात सदरील दिंडीतील भाविकांना एकनाथ जाधव यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती सदरील दिंडीत घोडा तसेच महिला पुरुष असे 400 भाविक सहभागी आहेत