यवतमाळ: जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा ; ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अधिक सजग होण्याची गरज
समाजजीवनात डिजीटल व्यवहारांचे प्रमाण वाढले असून, ते आत्मसात करताना ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अधिकाधिक सजग होण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय ग्राहकदिन कार्यक्रमात विविध मान्यवरांनी व्यक्त केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बळीराजा चेतनाभवनात कार्यक्रम झाला.