तळोधी येथील नवानगर जवळील हनुमान मंदिर चौकातील परिसरात हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या मुल येथील युवकास तळोधी येथे पोलीस द्वारे अटक करण्यात आली.आरोपी हा मुल येथील आठवडी बाजार वार्ड नंबर 17, मुल, तालुका मुल, जिल्हा चंद्रपूर येथील रुपेश बंडू कापते (37) वर्ष असून याचे विरुद्ध कलम 4, 25 भारतीय हत्यार अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.