शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत पंचायत समितीच्या वतीने पाळा येथे प्रभाग स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांचे हस्ते उद्घाटन संपन्न झाले. दोन दिवशीय असलेल्या या क्रीडा महोत्सवाचा आज दिनांक 12 डिसेंबरला साडेतीन वाजता सांगता समारोह संपन्न झाला. शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते