तालुक्यातील सालई (कला) शेतशिवारात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विश्वनाथ सर्जेराव खंडाते (वय ४५, रा. सोंडी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, सोमवारी (ता. २२) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी सर्जेराव खंडाते यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिसांनी सकाळी ११.४५ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून देण्यात आली.