15 डिसेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे प्रताप नगर हद्दीतील सहज कॉलनी येथे राहणाऱ्या मंजुषा पहाडे या घराला कुलूप लावून मोठ्या मुलीच्या घरी पुणे येथे गेल्या असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरी प्रवेश करून रोख रक्कम आणि बँकेच्या लोकरची चाबी आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून प्रताप नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे