दिग्रस शहरात कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीने खळबळ उडाली आहे. १५% परताव्याचे आमिष दाखवत शिक्षक, कर्मचारी आणि नागरिकांची मोठी फसवणूक झाली असून आरोपी गिरीश दुधे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. अजून अनेक गुंतवणूकदार पुढे येत असल्याने घोटाळ्याचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हा संपूर्ण घोटाळा काय? कोण किती अडकले? पोलिसांची पुढील कारवाई काय?