जालना ते जागतिक बाजारपेठ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, महिला व तरुणांना उद्योगक्षेत्रात प्रवेश करण्याची संधी मिळणार असून त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन आशिमा मित्तल यांनी केले. शनिवार दि. 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 ते 3 वाजेपर्यंत आयोजित एक पाऊल जागतिक बाजारपेठेकडे - आयात निर्यात कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.स्थानिक उत्पादने,कृषीपूरक उद्योग,महिला महिलांना याचा फायदा होईल.