वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीसांनी अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात गुंन्हा दाखल करत ट्रॅक्टर ट्रालीसह ७,०५,०००/- रू.चा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई तळेगाव टालाटूले शिवारातील नेरी नाल्याजवळ करण्यात आली. अल्लीपूर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर पोलिस स्टाफ सह गस्तीवर असताना रात्री नऊ वाजताच्या दरम्यान त्यांना नेरी नाल्याजवळ अवैध वाळू वाहतूक संबंधाने माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी घ