नगर-मनमाड महामार्गावरील सुरू असलेल्या कामामुळे जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्याबाबत संबंधित विभागाने पत्र दिलेले असतानाही प्रत्यक्षात मात्र अवजड वाहतूक सर्रास सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अरुंद झालेल्या रस्त्यावर मोठ्या वाहनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. विशेषतः दुपारच्या आणि सायंकाळच्या वेळेत ही समस्या अधिक तीव्र होत असून प्रवासी तासन्तास वाहतुकीत अडकून पडत आहेत.