आर्णीतील तुळजानगरीत सोमवारी रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी नकूल दत्ता राठोड (वय ४०) यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील आलमारीतील चांदीचे कॉइल २५० ग्रॅम, चांदीचे कोपर २० तोळे, कडे २० तोळे, साखळी २० तोळे, असे एकूण ३१० ग्रॅम चांदीचे दागिने किमत ४२ हजार पाचशे रुपये व सोन्याची अंगठी एक ग्रॅम, सोन्याचे कॉइन दोन नग एकूण चार ग्रॅम, असे ५ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत अंदाजे १५ हजार रुपये व रोख १५ हजार, असा एकूण ७२ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन