प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे थांबलेले निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम प्रशासनाने पुन्हा सुरू केले आहे. आंदोलक आता काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पाला मंजुरी मिळून ३० वर्षे लोटली, परंतु सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्तांचा विरोध असल्याने हा प्रकल्प दीर्घकाळ ठप्प होता. प्रकल्प रद्दच्या मागणीसाठी नागरिकांनी अनेक आंदोलने केली. त्यात काही वेळा परिस्थिती तणावपूर्णही झाली. मागील काही दिवसांत संबंधित विभागाकडून प्रकल्पाचे काम सुरूझाल्याची माहिती मिळताच प्रकल्प