भाजपच्या नेत्या माधुरी अत्तरदे यांनी शिंदे गटाचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उपोषण केले होते. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "मी जनतेचे काम करतो, मला कोणी शिवीगाळ करत असेल मला काही फरक पडत नाही आणि हे सगळं जनता पाहत असते. परंतु जनतेचे कामे करत राहणार आहे", असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.