आमगाव: रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : चौघांवर गुन्हा दाखल, ७१ लाखांचा माल जप्त
अवैधरीत्या उपसा केलेल्या रेतीची वाहतूक करीत असलेले दोन टिप्पर स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम परसवाडा शिवारात बुधवारी (दि. १७) रात्री १०:१५ वाजताच्या सुमारास या कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवायांत पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, ७१ लाख १२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे