समुद्रपूर:महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे अंतर्गत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर येथे 5328 रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदीला प्रारंभ झाला. बाजार समितीचे सभापती श्री. हिम्मतराव चतुर यांच्या हस्ते काटा पूजनाद्वारे नाफेडच्या सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी सोयाबीन आणणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथम आलेले शेतकरी विनोदराव ठवरी हळदगांव यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.