आज दि. 9 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखालील उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ तहसीलदार संजय वारकड नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांच्या पथकाने पहाटे 5 च्या सुमारास कल्लाळ पिंपळगाव निमजी परिसरामध्ये गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करत इंजन तराफे आदि मिळून 18 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. अशी माहिती संध्याकाळी 6 च्या सुमारास देण्यात आली आहे.