बाभूळगाव यवतमाळ रोडवरील करळगाव घाटात रविवारी सायंकाळच्या सुमारास देवी मंदिरा जवळ बिबट्याने कारचालकाला दर्शन दिले यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. यवतमाळ वरून बाभुळगाव कडे जात असणाऱ्या एका युवकाच्या कार पुढे बिबट्या उभा ठाकला. कार मध्ये असलेल्या फ्रंट कॅमेऱ्यात तो टिपल्या गेला. यामुळे वाहन चालकात भीतीचे वातावरण पसरले आहे.