नाशिक: शहरातील पाणीटंचाई प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापालिकेवर हंडा मोर्चा
Nashik, Nashik | Aug 4, 2025 नाशिक शहरात पावसाळ्यात देखील पाणीटंचाई जाणवत असून शहरातील रस्ते खड्डेमुळे झाले आहे महापालिका आयुक्त आणि प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे आज दि. 4 सोमवारी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक महापालिकेवर हंडा मोर्चा काढत महापालिकेच्या विरोधात तीव्र निदर्शने केले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील आणि सर्व शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.