वणी: कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर लोखंडी रॉडने केला हल्ला, गोकुळ नगर येथील घटना शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Nov 15, 2025 कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात पत्नीच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ही घटना गुरुवारी सायंकाळी शहरातील गोकुळनगर भागात घडली. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.