हिंगणघाट शहरातील मारोती वार्ड परिसरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील दंततज्ज्ञ डॉ. संदीप मुडे यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी थेट बेडरूममधील आलमारी फोडत मुद्देमाल चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याच परिसरातील आणखी दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती असून, या घटनेबाबत अद्याप अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही.प्राप्त माहितीनुसार डॉ. संदीप मुडे व त्यांचे पत्नी कामानिमित्त नागपूर येथे गेले होते.