दक्षिण सोलापूर: विनयभंगाच्या गुन्ह्यातून डॉक्टरची निर्दोष मुक्तता, अँड रियाज शेख यांची सोलापूर येथे माहिती
जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे काम करणाऱ्या सहकारी महिला डॉक्टर वर वाईट नजर ठेवून मोबाईलवर तू चीज बडी है मस्त मस्त हे गाणे चालू करून महिला डॉक्टरच्या खुर्चीजवळ येऊन विनयभंग केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातून आरोपी डॉ फारुख इलाही बागवान यांची सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विनायक रेडकर यांनी निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड रियाज शेख यांनी आज सायंकाळी 7 वा दिली आहे.