वाई पाचवड रस्त्यावर विना परवाना लाकडाची वाहतूक करणाऱ्यावर वाई वनविभागाची कारवाई शुक्रवारी रात्री वाई पाचवड रस्त्यावर विना परवाना लाकडाची वाहतूक करत असताना वाई वनविभागास राहुल ज्ञानेश्वर भिसे रा. सरताळे हा आढळून आला. त्याच्याकडून लाकडासह वाहन असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. ही कारवाई भुईजचे वनपाल दिलीप व्हनमाने, बेलमाचीच्या वनरक्षक अश्विनी नरळे यांनी केल्याची माहिती वनविभाग वाई यांनी शनिवारी दुपारी २ वाजता पत्रकारांना दिली.