महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना'**ने राज्यात गती घेतली आहे. आज आपण याच अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर ग्रामपंचायतीने जलसंवर्धनासाठी उचललेल्या एका प्रेरणादायक पावलाची माहिती घेणार आहोत.ग्रामस्थांनी आणि कृषी विभागाने एकत्रित येऊन, साप्ताहिक श्रमदानातून धोत्रा नाल्यावर एक महत्त्वपूर्ण 'अनघड दगडी बांध'नुकताच साकारला आहे! असे आज 14 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे