पारोळा------- पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भुषण कदम ( उच्च श्रेणी ) यांनी ग्रामपंचायत उंदीरखेडे येथे भेट दिली असता, त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत योजने अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत अंतर्गत अभ्यासिका, आयुष्यमान भारत लाभार्थी यादी, ऍग्री स्टॉक नोंदणी झालेले शेतकरी, जलतारा शोषखड्डे प्रस्ताव, गोठा शेड, ग्रामपंचायत दप्तर, सोलर, सोलर लाईट या सर्व बाबींविषयी महत्त्वाचे दप्तर आणि फाईल तपासणी केल्या.