दौंड: पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ ब्रिजवर कंटेनर व दुचाकीचा अपघात; पळसदेव येथील बापलेकाचा जागीच मृत्यू, आरोपी फरार
Daund, Pune | Nov 3, 2025 पुणे -सोलापूर महामार्गावर कुरकुंभ गावाच्या हद्दीतील ब्रिजच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत पळसदेव (ता. इंदापूर) येथील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे.खंडु नारायण बनसुडे (वय -35) व रूद्र खंडु बनसुडे ( रा. पळसदेव ता. इंदापुर) असे अपघातात मृत्यू झालेल्या बापलेकाचे नाव आहे.