औसा: लातूर येथील सिद्धेश्वर यात्रा महोत्सवात पार पडले औसेकर महाराजांचे चक्रीभजन
Ausa, Latur | Mar 12, 2024 लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून १२ मार्च रोजी सायंकाळी ह.भ.प गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन पार पडले. या यात्रा महोत्सवानिमित्त शुक्रवार दि.८ मार्च पासून विविध कार्यक्रम होत आहेत. ८ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची महापूजा व झेंडावंदन झाल्यानंतर महोत्सवास सुरुवात झाली.