विजय दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देश शौर्यगाथांना उजाळा देत असतानाच,नुकताच हिंगणघाटमध्येही वीर जवानांना भावपूर्ण मानवंदना देण्यात आली.माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्टतर्फे जयस्तंभ चौकात आयोजित या सोहळ्यात,कडाक्याच्या थंडीतही देशभक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. असल्याचे आज 17डिसेंबर रोजी दहा वाजता प्रसिद्धीस दिले या कार्यक्रमस माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू बसंतानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमत अमर जवान स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले